कोरोना व्हायरस संबंधित विविध अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात असल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता कोरोना बाबत पसरणाऱ्या अफवांमुळे व्हाट्सअप ने एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता व्हाट्सअप वर मेसेज फॉरवर्ड करायला निर्बंध येणार आहेत. याआधी एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. मात्र आता नवीन नियमानुसार एखादा मेसेज एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येणार आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेज रोखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
दरम्यान, व्हाट्सअप च्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. यानंतर निर्णयामुळे निश्चितपणे अफवा पसरवण्याला आळा बसणार आहे. संपूर्ण जगभरात दोन अब्ज पेक्षा अधिक लोक व्हाट्सअप वापरतात. भारतात हीच संख्या चाळीस करोड पेक्षा अधिक आहे.
Leave a comment