66 पैकी 55 निगेटिव्ह तर 3 अहवाल प्रलंबित
बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसात अकरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर मंगळवारी तब्बल 66 स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. यातील 8 जनांंचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून 3 प्रलंबित आहेत तर उर्वरित 55 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत.त्यामुळे आता एकूनसंख्या वाढून 19 एवढी झाली आहे .त्यामुळे बीडकरांची चिंता वाढली आहे .
बीड जिल्ह्यात मुंबईवरून आलेल्या काही लोकांमुळे कोरोनाचा फैलाव तीव्रतेने वाढीस लागला आहे.गेवराई,माजलगाव आणि आष्टी तालुक्यातील अकरा रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर प्रशासनाने दोन दिवसात तब्बल 140 पेक्षा अधिक स्वाब तपासणीसाठी पाठवले होते,यातील एवढे 8 रुग्ण आजच्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आढळून आल्याने लोकांची धडधड वाढली आहे .यातील दोन स्वाब हे केज ग्रामीण रुग्णालयातून तर 6 स्वाब हे बीडच्या रुग्णालयातून पाठवले आहेत .
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात मंगळवारी जे 8 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले त्यातील 5 जण बीड शहरातील आहेत. शहरातील मोमीनपुरा आणि सावतामाळी चौक या भागातील पाच जण पॉझिटिव्ह आढळेल आहेत.तर दोन जण केज तालुक्यातील आणि एक जण इटकुर येथील आहे .
बीड जिल्ह्यात 8 बाधित असे:-
१ ) इटकूर येथील कोरोनाग्रस्त मुलीची आई – वय 35
2) चंदनसावरगाव ता केज – वय 23 मुंबईहून आला
3) कळेगाव ता केज – वय 29 मुंबईहून आला
4) ठाणे येथून आलेले दोघे – वय 22 व 44 (मोमीनपुरा, बीड)
5) ठाणे येथून आलेले – वय 16, 14 व 36 (रा सावतामाळी चौक, बीड)
Leave a comment