बीड । वार्ताहर
कोरोना महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे. कोरोन बाधित रुग्ण, व मृत्यू यामध्ये राज्याचा अव्वल नंबर लागला आहे. शिवाय राज्य सरकार कडून शेतकरी व सामान्य जनतेसाठी कोणतेही आर्थिक पॅकेज जाहीर केलेले नाही. राज्य सरकारने जनतेला वार्यावर सोडले. राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना संकट गडद झाले आहे. राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदन दिले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत पदाधिकारी भगीरथ बियाणी, डॉ.लक्ष्मण जाधव, विक्रांत हजारी, शांतीनाथ डोरले, विलास बामणे, संभाजी सुर्वे, राजेश चरखा, दत्ता परळकर उपस्थित होते. या निवेदनात पुढे म्हटले आहे की सर्व देशाबरोबर महाराष्ट्र सुद्धा र्उेींळव-19 च्या विरोधामध्ये संघर्ष करत आहे. परंतु संपूर्ण देशामध्ये र्उेींळव-19 चे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर याच्यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेला आहे. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राज्य सरकारच्या नेतृत्वाचं या सर्व गोष्टींकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष याचमुळे आज महाराष्ट्राची, महाराष्ट्रातल्या जनतेची अशाप्रकारची दयनीय अवस्था झालेली आहे. राज्यामध्ये प्रशासन नावाचं काही चीज अस्तित्वात आहे. अशा प्रकारची भावना आता लोकांमध्ये उरलेली नाही. किँबहुना राज्य करणारे जे सत्ताधारी आहेत यांचं अस्तित्वच याठिकाणी जाणवत नाही आणि अशा प्रचंड मोठ्या संकटाच्या वेळेला राज्यकर्त्यांनी जनतेला पूर्णपणे वार्यावर सोडलं आहे अशा प्रकारची लोकांमध्ये स्वभाविक भावना निर्माण झालेली आहे. राज्याच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही असे चित्र वारंवार समोर येत आहे. काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा सरकारवर या सर्वच बाबतीत कठोर टीका केलेली आहे. राज्यकर्ते स्वतःच्या भांडणांमध्ये आणि स्वतःच्या स्वार्थामध्ये मग्न आहेत असं आज या महाराष्ट्राचे चित्र आहे. या सर्व गोष्टीचा आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नागरिक तीव्र निषेध करतो आणि र्उेींळव-19 विषयात तातडीने पावलं उचलून याला अटकाव करावा व महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांकरीता आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी सुद्धा आम्ही या निमित्ताने करत आहोत.
Leave a comment