पाटोदा । वार्ताहर
नागरिकांनी अत्यावशक कामाशिवाय रस्त्यावर गर्दी करू नये तसेच घाबरून न जाता घरीच सुरक्षित राहून प्रशासनाला सहकार्य करावे म्हणून मंगळवारी (दि.19) संचारबंदी शिथिल काळानंतर दुपारी तीन वाजता तहसील विभाग, पाटोदा पोलीस, आरोग्य विभाग, नगरपंचायत कार्यालय या सर्व विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख रस्त्यावरून रखरकत्या उन्हात पाटोदा शहरातील प्रमुख रस्त्यावरून संयुक्त पथसंचलन केले.
आम्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर गर्दी करू नये, सामाजिक अंतर पाळावे, अफवा पसरवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पथसंचलनात तहसीलदार मुंडलोड, पोलीस निरीक्षक माने, नगरपंचायत मुख्याधिकारी भोसले, अतिरिक्त पोलीस निरीक्षक कोळेकर यांच्यासह आरोग्य विभाग, पोलीस विभाग, तहसील विभाग नगरपंचायत विभाग कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment