बीड । वार्ताहर

कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राष्ट्रीयकृत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांनी शाखांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होऊ नये यासाठी खरीप हंगाम सन 2020-21 करिता पीक कर्ज वाटप करताना बँकांनी किसान क्रेडिट कार्डद्वारेच पीक कर्ज वाटप करावे असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्देश दिले आहेत. 

 जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, पीक कर्जाचे वाटप संबंधित गावात जाऊन करावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपाबाबत संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या गट सचिवांनी दररोज पीक कर्ज मागणी अर्ज शेतकर्‍यांकडून गोळा करून बँक शाखेत दाखल करावेत. बँकेने दिलेले शेतकर्‍यांचे किसान क्रेडिट कार्ड शेतकर्‍यांना दुसर्‍या दिवशी गावात जाऊन जागेवर वाटप करावे.सर्व बँकांनी पीक कर्जवाटपाचे गाव निहाय वेळापत्रक तयार करून या कार्यालयास सादर करावे. सदर वेळापत्रकास जाहीर प्रसिद्धी द्यावी. मेळाव्याचा कार्यक्रम 18 मे 2020 पासून सुरु करावा. संबंधित गावात सदर वेळापत्रकास पुरेशी प्रसिद्धी द्यावी. सदर पीक कर्ज मेळाव्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन,मास्क लावणे ,सॅनिटीझरचा वापर या गोष्टींचे कागदपत्रे हाताळताना बारकाईने पालन करावे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गटसचिवांनी त्यांच्या  कर्जदारांच्या याद्या गावनिहाय दररोज संबंधित जि. म.स बँक शाखेला द्याव्यात. तसेच, शेतकर्‍यांना मागणीनुसार वेळेवर नाहरकत दाखला देण्यात यावा.तसेच, जुन्या पीक कर्ज थकबाकीदारांच्या याद्या सर्व संबंधित बँकांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्या.तसेच, सर्व सचिवांच्या सह्यांचे नमुने सर्व संबंधित बँकांना तात्काळ उपलब्ध करून द्यावे.पीक कर्ज मागणी अर्ज भरून घेताना 10 पानाच्या  चेक बुकची मागणी घ्यावी. प्रत्येक शेतकर्‍यास या चेक बुकसह पोस्टाने घरपोच किसान क्रेडिट कार्ड(-ढच्) कार्ड द्यावे. कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या शाखेत शेतकर्‍यांना यावे लागू नये याची खात्री करावी.सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप फक्त किसान क्रेडिट कार्ड द्वारेच करावे असा शासनाचा आदेश आहे. किसान क्रेडिट कार्ड शिवाय कर्ज वाटप केल्यास बँकांना शासनामार्फत दिल्या जाणार्‍या व्याज सवलतीचा फायदा मिळणार नाही. पीक कर्जाची रक्कम बँकेच्या शाखेतून काढता येणार नाही. ती ग्राहक सेवा केंद्र,-ढच् द्वारेच काढावी लागेल अशा प्रकारच्या सूचनांचे बॅनर प्रत्येक शाखेत लावावेत. तसेच वरील सूचनांचा शिक्का कर्ज मागणी अर्जावर मारावा. कोणीही शेतकरी रक्कम काढण्यासाठी बँक शाखेत येणार नाही नाही याची काळजी घ्यावी. जर शेतकरी बँकेत आल्यास त्यांना कॅशमध्ये रक्कम देऊ नये.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बँकांनी सर्व व्यवहार ग्राहक सेवा केंद्रामार्फत करावेत. ग्राहक सेवा केंद्राची सर्वसमावेशक यादी सर्व बँकांच्या शाखा तसेच गावातील प्रमुख ठिकाणी लावण्यात यावी. सदर यादीत गावाचे नाव, तालुक्याचे नाव, ऑपरेटर चे नाव ,मोबाईल क्रमांक व ग्राहक सेवा केंद्राचा पत्ता नमूद करावा. वरील नमुन्यात केंद्राची यादी -श्रश्र इरपज्ञी चरपरसशी या व्हाट्सअप्प ग्रुप वर टाकावी. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांनी ग्राहक सेवा केंद्राची एकत्रित यादी तयार करून सादर करावी. सदर यादीत संबंधित ग्राहक सेवा केंद्राशी कोणती गावे हे जोडली आहेत त्यांची नावे नमूद करावीत.पिक कर्ज मेळाव्यास तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक, गावचे सरपंच व पोलिस पाटील यांना बोलवण्यात यावे सदरचा मेळावा बैठक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात, ग्रामपंचायत मध्ये घेण्यात यावी. या बैठकीत कर्ज मागणी अर्जाचे वितरण, कर्ज मागणी अर्ज स्वीकारणे ही कामे करावीत आदी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.