वडवणी । वार्ताहर
पती-पत्नीचे नविन मतदान ओळखपत्र काढून देण्यासाठी प्रत्येक कार्डसाठी 100 रुपये अशी एकूण 200 रुपयांची लाच मागणार्या वडवणी तहसील कार्यालयातील डाटा एंन्ट्री ऑपरेटर विरुद्ध दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला. एसीबीच्या अधिकार्यांनी ही माहिती दिली.
प्रफुल्ल भारत बनसोडे, (22, रा. भिमनगर, वडवणी) असे गुन्हा दाखल झालेल्या परिचालकाचे नाव आहे. एका दाम्पत्याला त्यांचे नवीन मतदान ओळखपत्र काढून देण्यासाठी बनसोडेने 10 फेब्रुवारी 2020 रोजी 200 रुपयांची लाच मागितली होती. नंतर नागरिकाने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली.तकारीच्या अनुषंगाने 14 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल बनसोडेकडे तकारदार हे त्यांच्या कामानिमित्त भेटण्यासाठी गेले बनसोडेने कामासंबंधी संभाषण केले परंतु संशय आल्याने बनसोडे तेथुन निघून गेला मात्र त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्मन्न झाले त्यावरून प्रफुल्ल भारत बनसोडे विरुध्द वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास निरीक्षक रवींद्र परदेशी हे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया,अपर अधीक्षक,डॉ.अनिता जमादार, उप अधीक्षक हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनालाली निरीक्षक, रविंद्र परदेशी, राजेंद्र पाडवी, पोना श्रीराम गिराम, हनुमंत गोरे, पोह. भरत गारदे, मनोज गर्दळे , नदीम सयद यांनी केली.
Leave a comment