डॉ.अशोक थोरात यांची माहिती
बीड । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील कोरोनाबाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा व्हिडीओ मंगळवारी (दि.19) व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.
सांगवी (ता.आष्टी) येथे नातेवाईकांकडे मुंबईहून आलेल्या व नगर जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेले 7 जण कोरोनाबाधित आढळले होते. यातील 65 वर्षिय महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला होता. दरम्यान, उर्वरित सहा रुग्णांना त्यांच्या विनंतीनुसार सोमवारी सायंकाळी पुण्याच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यासाठी विशेष परवानगी घेतली गेली. पुण्याला जाण्यासाठी रुग्णालयाबाहेर त्यांना आणण्यात आले होते. सर्व रुग्णांना सूचना देण्यात आल्या.यात कुणी निष्काळजीपणा केला याबाबत चौकशी सुरु केली गेली आहे. शिवाय, कोरोना कक्षात काम करणार्या कर्मचार्यांना रुग्णांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालय अथवा जिल्ह्यातील इतर कोणत्याही सरकारी रुग्णालयात, क्वारंटाईन सेंटरमध्ये अथवा होम क्वारंटाईन शिक्का असलेली कुणी संशयित, बाधित व्यक्ती इतरत्र फिरताना आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांचे चौकशीचे आदेश
बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना बाधित रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरतानाचा एक व्हीडिओ आज (मंगळवार) रोजी व्हायरल झाला होता, हे प्रकरण गंभीर असून याची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहेत
Leave a comment