वाटप करून शेतकर्यांना दिलासा द्यावा
खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांची कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे मागणी
बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकर्यांचे प्रलंबित फळबाग अनुदान वाटप करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी राज्याचे कृषी मंत्री श्री.दादा भुसे यांच्याकडे केली आहे.आर्थिक वर्ष 2019 व 2020 या कालावधीतील तीन कोटी रुपयांचे फळबाग अनुदान राज्य सरकारकडे प्रलंबित असून जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा मिळावा याकरिता त्यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतील सहाशे दोन शेतकर्यांचे तीन कोटी रुपयांचे फळबाग अनुदान राज्य सरकारकडे प्रलंबित असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 26 मार्च 2020 रोजी हे अनुदान परत गेले होते.मागच्या बाकी देयकामध्ये हे अनुदान सरकारने देणे अपेक्षित होते.कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थितीत शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने फळबाग अनुदान वितरित करावे.मागील बाकी देयकांमध्ये ही रक्कम वितरित करण्याचा अधिकार सरकारला असल्यामुळे शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देऊन सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी केली आहे.निसर्गाची अवकृपा व कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने फळबाग उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.या प्रलंबित अनुदानाने शेतकर्यांना अंशतःदिलासा मिळणार असून फळबाग उत्पादक शेतकर्यांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधून अनुदानाची मागणी सरकार दरबारी मांडल्यामुळे शेतकर्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे.प्रलंबित फळबाग अनुदानासाठी खा.प्रितमताई मुंडे यांनी पुढाकार घेतल्यामुळे शेतकरी वर्गातून खा.मुंडे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.
Leave a comment