सरकारचे सुडाचे राजकारण- माऊली जरांगे
बीड । वार्ताहर
देशात कोरोणा दिवसे दिवस वाढत चालला प्रशासनाला मदत करण्यासाठी आ सुरेश धस पुर्णवेळ काम करतात प्रशासन मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल करते सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचे माऊली जरांगे यांनी आरोप केला आहे.
आ. सुरेश धस यांची कामाची पध्दत जनता दैवत. जनतेचे सुख दुख ते माझे यात प्रशासन पोहचायच्या अगोदर आ धस पोहचतात व तेथे जनतेला काळजी घेण्याची विंनती करतात व प्रशासनाला आवश्यक मदत करतात ऊसतोडणी मजूर चिघळलेला प्रश्न सोडवत मदत केली. आता पाटण सागंवी येथे मुबंईवरुन आलेले पाहुणे यांची माहिती स्थानिक लोकांनी आ धस यांना रात्री 7: 15 मिनिटानी दिली लगेच आ.धस यांनी प्रशासनाला माहिती देऊन या संसयीत लोकांची तपासणी करण्याचे सांगितले व गावातील लोक घाबरले होते. अशावेळी प्रशासनाने यंत्रणा लावण्या अगोदर आ.धस यांनी गावाच्या प्रवेशद्वारावर प्रमुखांना सामाजिक अंतराचा नियम पाळुन मार्गदर्शन करून गेले.
आणि प्रशासनाने गुन्हा दाखल केला प्रशासन काम करणार्यावर गुन्हा दाखल करतय व क्वॉरटाईन केलेले काँग्रेसचे एक नेते एका मंत्र्यांच्या ताफ्यात फिरतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणजे सरकार आ. सुरेश धस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे जिल्हा प्रशासनाच्या एकंदरीत वागण्यावरून दिसत आहे असा आरोप जरांगे यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
Leave a comment