सभापती शञुघ्न मरकड यांची तक्रार
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील मंगरुळ येथील शासकीय तूर आणि हरभरा खरेदी करताना जादा पैसे घेतले जात असल्याने शेतक-यांची पिळवणूक होत असून पणन महासंघाचे दुर्लक्ष होत आहे.त्यामुळे या केंद्रावर शासकीय अधिकारी नियंञक म्हणून नेमण्यात यावेत अशी लेखी तक्रार कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती छञुघ्न मरकड यांनी व्यवस्थापकीय संचालक पणन महासंघ मुंबई यांचेकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,चिखली ता.आष्टी येथील जगदंबा कृषी माल पुरवठा व पणन सहकारी संस्था मर्यादित चिखली या संस्थेला मंगरुळ ता.आष्टी या ठिकाणी या संस्थेला तूर आणि हरभरा खरेदीसाठी शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत परवानगी दिली आहे.या ठिकाणी शेतक-यांकडून प्रतिक्विंटल 100 रु.ते 200 रु.एवढी रक्कम बळजबरीने घेतली जात आहे अशी शेतक-यांची तक्रार आहे.परंतु केंद्रचालकाच्या दहशती मुळे शेतकरी तोंडी तक्रार करत आहेत.त्यामुळे या ठिकाणी शेतक-यांची होणारी लूट थांबवण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि या केंद्रावर शासकीय नियंञण अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Leave a comment