आ.पवार, नगराध्यक्ष जवंजाळ यांनी व्यक्त केले समाधान
गेवराई । वार्ताहर
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कचरामुक्त शहराच्या स्टार रेटिंगमध्ये मराठवाड्यातील सहा नगर परिषदेचा समावेश झाला असून, मराठवाडा विभागातील 84 न.प. ने कचरा मुक्त शहराच्या स्टार रेटिंगमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी सहा नगर पालिकेला स्टार रेटिंग मिळाले असून गेवराईने बाजी मारली आहे. दरम्यान मराठवाडा विभागातील 84 नगर परिषदेपैकी जाहीर करण्यात आलेल्या सहा न.प.मध्ये गेवराई नगर परिषदेचा समावेश झाल्याने, आमदार लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. शहरातील नागरिकांच्या पाठिंब्याने यश मिळाले असून नगर परिषदेच्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया आमदार पवार यांनी दिली आहे.
गेवराई नगर परिषद शहरातील शंभर टक्के कचरा उचलून त्याचे विलगीकरण करून ओला सुका कचर्याच्या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती करण्यात येते. कचरा गोळा करण्यासाठी नपची स्वंतत्र यंत्रणा सज्ज असते. तीन चाकी रिक्षा घंटागाडी ने प्रभागात जाऊन कचरा गोळा केला जातो. त्यासाठी नप चे सफाई कामगार कार्यरत असून, सदरील खत वक्ष लागवड व शेतकर्यांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येते. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या कचरा मुक्त शहराच्या स्टर रेटिंग मध्ये भारतातील 4030 शहरातुन 140 नगर परिषदा व महानगरपालिका पात्र ठरल्या आहेत. औरंगाबाद विभागातून एकूण 85 न.प , मनपातून ज्या 6 नगर परिषदा पात्र झाल्या आहेत. त्यात गेवराई नगर पालिकेने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्यातील गेवराई एकमेव नगर पालिका स्टार रेटिंग मध्ये पात्र ठरली आहे. गेवराई नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कचरा गोळा करण्यासाठी नपची स्वंतत्र यंत्रणा आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगले सहकार्य व सहभाग मिळाला आहे. चांगल्या गोष्टीचा शहरवासियांना फायदा होईल, तसेच त्यांचे हित लक्षात घेऊनच काम केले जात असून, नागरीकांच्या आशीर्वादाने स्टार रेटिंग मध्ये यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील सहा नगर परिषदा यशस्वी झाल्या आहेत, त्यामध्ये गेवराई नगर परिषदेला मानाचे स्थान मिळाले आहे. त्याचा आनंद असून, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आल्याने, त्याचा उपयोग झाला आहे. नागरीकांचे सहकार्य व कर्मचार्यांनी घेतलेली मेहनत महत्त्वाचा भाग आहे. गेवराई नगर परिषदला मिळालेल्या स्टार रेटिंग मुळे आनंद व्यक्त करून नगराध्यक्ष सुशील जवंजाळ म्हणाले की, आता आपली जबाबदारी आणखी वाढली असून, आमदार लक्ष्मण पवार, गिता भाभी यांच्या मार्गदर्शनाखाली नपने या अभियानात सहभाग घेतला होता. सर्व नागरिकांनी सहकार्य केले. भालेराव मॅडम यांचे ही योगदान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कर्मचारी सक्षमपणे काम करतात मात्र नगरिकांची साथ आहे. म्हणूनच नपला यश मिळाले असून सामूहिक यशाचे स्वागत करत असल्याचे उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभूवनकर यांनी सांगितले.
Leave a comment