परस्परविरोधी तक्रारीवरुन चौघांवर गुन्हा
केज । वार्ताहर
केज तालुका भाजपचे अध्यक्ष भगवान केदार यांनी आणि त्यांच्या दोन साथीदारांनी नवनाथ नेहरकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दाखल केली आहे तर आपली सोशल मीडियावरून बदणामी केली अशी तक्रार भगवान केदार यांनी नवनाथ नेहरकर यांच्या विरुद्ध केली. या प्रकरणी केज ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवनाथ सुधाकर नेहरकर (28,रा. पिसेगाव ता.केज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि.18) सायंकाळी त्यांच्या वडीलांचे फिटनेस प्रमाणपत्र काढण्यासाठी केज उपजिल्हा रुग्णालयात गेले. तेथे भाजपाचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, त्यांचे साथीदार अविनाश रामभाऊ नेहरकर व पिंग्या नेहरकर यांनी नेहरकर यांना ‘माझ्या विरुध्द तु कोठे पण काही पण कशामुळे बोलतो? तु माजलास का? असे म्हणत भगवान केदार यांची बाजू घेवुन नेहरकर यास जीवे मारण्याची धमकी दिली. यावरुन भगवान केदार आणि इतर दोघाविरोधात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक उपनिरीक्षक महादेव गुजर तपास करत आहेत. तर मंगळवारी (दि.19) भगवान केदार यांनीही नवनाथ नेहरकर यांच्या विरोधात तक्रार दिली. नेहरकर यांनी समाज माध्यमावर बदनामीकारक मेसेज व्हायरल करत बदनामी करुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार नवनाथ नेहरकर यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला.
Leave a comment