बीड । वार्ताहर
सोमवारी 77 पैकी 73 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बीड जिल्ह्यातून आज मंगळवारी (दि.19) एकूण 49जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.सायंकाळपर्यंत हे अहवाल जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होतील.
बीड जिल्ह्यात सोमवारी 77 जणांचे स्वॅब तपासले गेले होते, यातील 73 रिपोर्ट निगेटिव्ह आले ते 2 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अन्य 2 जणांचे स्वॅब पुन्हा तपासले जाणार आहेत दरम्यान यानंतर आज मंगळवारी सकाळी बीड जिल्हा सामान्य रुग्णालयातून सर्वाधिक 36, अंबाजोगाई येथून 2, केज उपजिल्हा रुग्णालयातून 8 व गेवराई उपजिल्हा रुग्णालयामधून 3, असे एकूण 49 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवले आहेत.
दरम्यान सोमवारी माजलगावात तालुक्यातील कवडगाव थडी येथे दोन रुग्ण आढळून आले होते. ते मुंबईहून आलेल्या बसमधील इतर प्रवाशांचा आरोग्य विभागाकडून शोध घेण्यात येत असून त्यांचेही स्वॅब तपासणीला पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान सध्या बीड जिल्ह्यात एकूण 5 रुग्णांची अधिकृत नोंद असून यात पिंपळा, इटकूर, हिवरा येथील प्रत्येकी 1 तर कवडगाव थडी येथील 2 जणाचा समावेश आहे.
Leave a comment