नेकनूर । वार्ताहर
नेकनूर जवळील नागिबाचा माळ शेतात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तीन-चार दिवसांपूर्वी सदर महिलेचा मृत्यू झाला असून हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वैतागवाडी येथील सुभद्राबाई नानाजी डिसले (70) असे या वृद्ध महिलेचे नाव आसून सदरील महिला ही चार पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या परिसरात शेती करणार्या व्यक्तीला प्रेत आढळून आल्याने त्याने पोलिसांना याची माहिती कळवली या भागातून वैतागवाडीकडे रस्ता जात असल्याने पायी जात असताना सदर महिलेला ह्रदयविकाराचा झटका आला असावा अशी माहिती मिळत असून पोलिस कॉन्स्टेबल बामदळे, खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment