आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर या ठिकाणी महसूल प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकार्यांनी धाव घेतली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी याठिकाणी मुंबईहून आलेल्या पाहुण्यामुळे कोरोनाचा प्रसार झाला असून तालुका चिंताग्रस्त बनला असून तालुक्यातील वातावरण ताईट झाले आहे.
सोमवारी सकाळी तहसीलदार नीलीमा थेऊरकर यांच्यासह आरोग्य विभाग व पोलिस अधिकारी,कर्मचारी यांनी सांगवी पाटण परिसरातील दहा गावे सील केले असून या भागाची पाहणी केली तसेच कोणाला जर सर्दी खोकला ताप अशी लक्षणे असल्यास त्वरित नागरिकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आरोग्य विभागानेही सांगवी पाटण सह धामणगाव कारखेल तांडा इत्यादी गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली असून प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे सांगवी पाटण गावातील नागरिकांनी सोमवारी दिवसभर घरातच राहून एक प्रकारे धास्ती घेतल्याचे चित्र दिसून येत होते प्रत्येकजण घराच्या आत मध्ये बसून बाहेर कोण अधिकारी , कर्मचारी कोण कोण येतंय याची पाहणी करत होते.
आ.सुरेश धस यांनी दिली सांगवी पाटणला भेट
रविवारी रात्री सांगवी पाटण येथे सात जणांचे नमुने पॉझिटीव्ह आल्यानंतर सोमवारी सकाळी आमदार सुरेश धस यांनी सांगवी पाटण येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत लोकांना धीर दिला. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून आपण कोरणावर मात करू असा विश्वास दिला. यावेळी आमदार धस यांनी पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्याशी सविस्तर चर्चा करत मार्गदर्शक सूचना केल्या.
Leave a comment