बीड जिल्ह्यातील पहिले हॉस्पिटल
बीड । वार्ताहर
येथील डॉ.दिलीप खरवडकर आणि डॉ.सौ.देवयानी खरवडकर यांच्या प्रशांत हॉस्पिटलला केंद्र सरकारच्या दिल्ली येथील क्वालिटी कोन्सिल ऑफ इंडिया मार्फत रुग्णालयाच्या योग्य मापदंडाच्या मानकासाठी दिल्या जाणार्या नॅशनल अक्रीडेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अर्थात एनएबीएच या संस्थेच्या मार्फत मानाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.असे मानांकन मिळवणारे प्रशांत हॉस्पिटल हे जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरले आहे.
मागील महिन्यातच महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या गोरगरिबांसाठी जीवनदायिनी ठरलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये देखील प्रशांत हॉस्पिटलचा समावेश करण्यात आला असून प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आयुष्यमान भारतसाठी सुद्धा प्रशांत हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे .या दोन्ही योजना प्रशांत हॉस्पिटलमध्ये कार्यान्वीत झाल्या आहेत. 55 वर्षांपूर्वी 25 ऑक्टोबर 1965 रोजी कै डॉ प्रभाकरराव खरवडकर व कै डॉ श्रीमती वनमाला खरवडकर या डॉक्टर दाम्पत्याने प्रशांत हॉस्पिटलची स्थापना केली.त्यांचे पुत्र डॉ दिलीप खरवडकर व स्नुषा डॉ देवयानी दिलीप खरवडकर हे त्यांचा रुग्णसेवेचा वसा पुढे चालवीत आहेत.डॉक्टर दाम्पत्याच्या अथक परिश्रमातुनच प्रशांत हॉस्पिटलला बीड जिल्ह्यातील पहिले एनएबीएच मान्यताप्राप्त होण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. डॉ दिलीप खरवडकर व डॉ सौ देवयानी खरवडकर यांनी यावेळी आईवडिलांनी चालू केलेला रुग्णसेवेचा वसा पुढे नेण्याचा मानस बोलून दाखवला असून त्यांचे आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्यांचे अभिनंदन होत आहे.
Leave a comment