आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण गावात रविवारी सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झाले असून तेरा सर्वेक्षण पथकामार्फत पाच गावांतील कुटुंबांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या तपासणीला आज सुरुवात झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठुळे यांनी दिली.
तालुक्यातील सांगवी पाटण येथे मुंबईहून काही पाहुणे आपल्या नातेवाईकाकडे आले होते. ही संख्या सात इतकी होती. यातील एका वृद्ध व्यक्तीला त्रास जाणवू लागल्याने त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वब टेस्ट केल्यानंतर हे सर्वच कोरोना बाधित असल्याचे अहवाल आल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. दरम्यात या मधील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे आष्टी तालुका आरोग्य विभागाकडून सांगवी पाटण सह चार गावात तीन वैद्यकीय अधिकाऱयांच्या नियंत्रणाखाली एक आरोग्य सेवक आणि एक शिक्षक यांचे पथक तयार करण्यात आले असून या गावातील 1276 कुटुंबांचे आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण करणार आहेत. यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी तीन पर्यवेक्षकीय अधिकारी नियुक्ती करण्यात आले आहेत.
Leave a comment