माजलगाव । वार्ताहर
आमदार प्रकाश सोळंके यांच्या पाठपुराव्यामुळे परवा दि.20 मे पासून सहा शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. दरम्यान ही नवी कापूस खरेदी केंद्रे सुरू होत असल्याने शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्षेत असलेल्या कापूस कापूस उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होवू नये यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र यासाठी माजलगावतील पूर्वा, महाराष्ट्र आणि अंबादास या जिनिंग तर धारूरमध्ये भोपा येथील नर्मदा जिनिंग आणि धारूर शहरातील लक्ष्मी व्यंकटेश तसेच वडवणी येथील एका जिनिंगवर शासकीय कापूस खरेदी सुरू होणार आहे. माजलगावात तब्बल 3316 प्रतिक्षेत आहेत. तर वडवणीत 1990 शेतकरी प्रतिक्षेत आहेत. तर धारूर तालुक्यात 3014 शेतकरी प्रतिक्षा यादीवर आहेत या सर्व शेतकर्यांच्या मागणीचा आणि समस्येचा विचार करून करून नव्या सहा जिनिंगला कापूस खरेदीसाठी दि.20 मेपासून परवानगी दिली असल्याची माहिती माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली. दरम्यान, आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रयत्नांमुळे शेतकर्यांचा मोठा प्रश्न सुटला आहे अशा प्रतिक्रिया कापूस उत्पादक शेतकर्याकडून उमटत आहेत.
-----
Leave a comment