जयदत्त क्षीरसागरांची मदत पंधरा हजार नागरिकांपर्यंत पोहचली

बीड । वार्ताहर 

जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणात कायम जनतेबरोबर आणि जनतेसाठी काम करणार्‍या जयदत्त क्षीरसागरांनी कोरोना संकटात आपल्या मतदार संघातील जनतेला दैनंदिन जीवनामध्ये मदत व्हावी या हेतुने घरात लागणार्‍या आवश्यक त्या किराणा सामानातील काही वस्तू गेल्या आठवड्याभरापासून वाटप करणे सुरू केले आहे. अडचणीच्या काळात ही मदत भेटल्याने ग्रामिण भागामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राजकारणात काही झाले तरी जयदत्त क्षीरसागरांचा आधार मिळतोच अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

राज्यात कोरोना संकट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यालाही त्याची झळ बसली आहे. जिल्ह्यातही जवळपास सर्व व्यवहार बंद आहेत त्यामुळे ग्रामिण भागातील लोकांसमोर रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतातील कामे संपली आहेत. अशा परिस्थितीत शहरात जावून काम करणार्‍या लोकांसमोरही प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा संकटामध्ये शहरातील गोरगरीब लोकांना अनेकांच्या मदतीचा आधार मिळतो, मात्र ग्रामिण भागातील लोकांना ही मदत मिळत नाही. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या मतदार संघातील काही कार्यकर्त्यांशी मोबाईलवरून संपर्क करून त्या-त्या गावातील माहिती घेतली आणि लोकांना नेमके काय हवे आहे याचा अंदाज घेतला त्यानुसार किराणा साहित्याचे किट, बॅग त्यांनी तयार केली. साधारणत: एका कुटूंबाला महिनाभर पुरेल एवढे किराणा साहित्य तेही प्रति मानसी त्यांनी मदत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि गेल्या आठवड्यापासून ही मदत वाटप करण्याचे काम सुरू करण्यात आले.  आपल्या संस्थेच्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या गावांना केंद्र ठरवून मतदार संघातील जवळपास दीडशेपेक्षा अधिक गावांमध्ये मदत मिळविण्याचे नियोजन त्यांनी केले. 

त्यांच्या संस्थेतील कर्मचार्‍यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नाळवंडी केंद्रावरून दहा गावे, शिवणी केंद्रातील वीस गावे, पोखरीमधील तेरा गावे, पालीमधील अकरा गावे, मोरगाव केंद्रातील 21 गावे, पिंपळवाडी हायस्कुल सेंटरवरील 17 गावे, फुड टेक्नॉलाजी महाविद्यालयात सेंटरवरील 24 गावे, कामखेडातील 9 गावे, चौसाळ्यातील 24, सुतगिरणी, ईट सेंटरवरील 37 गावे, आर्वीमधील 16 गावे, कुर्ला, यशवंत विद्यालय सेंटरवरील 21 गावे, रायमोहा केंद्रावरून 19 गावे अशा जवळपास 13 सेंटरवरून 25 हजार ग्रामस्थांपर्यंत त्यांची मदत पोहचली आहे. ग्रामिण भागामध्ये जयदत्त अण्णांनी संकटाच्या काळात केलेल्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. सत्तेवर नसल्याने त्यांना मदत मागावी कशी? असा प्रश्‍न काही प्रमुख कार्यकर्त्यांना पडला होता, मात्र स्वत: क्षीरसागरांनीच यासंदर्भात बोलते केले आणि त्यांच्याच माध्यमातून ही मदत ग्रामिण भागापर्यंत पोहचविली. या सर्व नियोजनामध्ये बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम, दुध संघाचे चेअरमन विलास बडगे, खरेदी -विक्री संघाचे चेअरमन जगदीश काळे, अरूण डाके, दिलीप गोरे, वैजीनाथ मिसाळ, सखाराम मस्के, गणपत डोइफोडे, चौसाळ्याचे विलास महाराज शिंदे, नाळवंडीचे अ‍ॅड. राजेंद्र राऊत, रायमोहाचे सुधाकर मिसाळ, सुभाष क्षीरसागर, अरूण बोंगाने, गोरख धन्ने आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.