सैनिकी शाळेचा नावीन्य पूर्ण उपक्रम
बीड । वार्ताहर
नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) संचलित सैनिकी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, बीड ही जिल्ह्यातील एकमेव सैनिकी शाळा आहे. कोविंड -19 मुळे जगभरासोबतच देशात देखील गेली दोन महिने लॉक डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शाळा बंद पण शिक्षण सुरु हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला असल्याची माहिती सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री.डाके एस.ए.यांनी दिली.
कोरोना मुळे संपुर्ण जग ठप्प झाले आहे. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या खाली वेळेत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्याचे तसेच शैक्षणिक प्रगती साठी डा.योगेशभैय्या क्षीरसागर व संस्था प्रशासक प्रा.डा.राजू मचाले सर यांच्या प्रेरणेने सैनिकी शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवून विद्यार्थ्यांना सक्रीय ठेवण्यासाठी या उपक्रम अंतर्गत आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रत्येक विषयानुसार सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमावर आधारित उपयुक्त व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षकांनी दिलेला अभ्यास व गृहपाठ पूर्ण करून सर्व विद्यार्थी सायंकाळी 5 ते 7 या यावेळेत शिक्षकांना पाठवतील. माझी शाळा या शासनाच्या पच्या मदतीने सर्व विषय शिक्षक नावीन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्राचार्य डाके एस.ए.यांनी दिली.
17
May
Leave a comment