बीड । वार्ताहर
कोरोनासारख्या आजारावर आर्सेनिक 30 हे होमिओपॅथी औषधी प्रतिबंधात्मक म्हणून उपयुक्त आहेच परंतु आर्सेनिक औषधी घेतली म्हणून बिनधास्त राहू नका, केंद्रीय आरोग्य व आयुष मंत्रालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन तंतोतंत करणे गरजेचे आहे. सोसिएल डिस्टनसिंग, वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटाईझर चा वापर करणे, लॉकडाऊन मध्ये घराबाहेर न जाणे गरजेचे आहे नाहीतर आम्ही आर्सेनिक घेतले आम्ही कसेही वागलो. आम्हाला काही होणार नाही या भ्रमात कोणी राहू नये असा इशारा डॉ.अरुण भस्मे यांनी दिला आहे.
केंद्रीय होमिओपॅथी अनुसंधान परिषदेने आर्सेनिक 30 पोटेन्सी चे औषध प्रतिबंधात्मक म्हणुन सुचविले आहे. ज्या राज्यांनी याची वेळीच दखल घेतली व त्यांनी आर्सेनिक हे औषध देण्यास सुरवात केली त्यामळे तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही. लोकांना मोफत औषधाची किँमत नसते. या गोळ्यांनी काय होते? असा अपप्रचार करणारे महाभाग काही कमी नाहीत. नजिकच्या होमिओपॅथी डॉक्टरांकडून आर्सेनिक 30 हे औषध सकाळी उपास्या पोटी तीन दिवस 4 गोळ्या घ्याव्या,15 दिवसांनी पुन्हा तीन दिवस घ्यावे. होमिओपॅथी औषधी घेताना आधी अर्धा तास व नंतर अर्धा तास काहीही घेऊ नये, लसुण, कांदा, कॉफी घेऊ नये, कापरासारख्या उग्र वासाच्या पदार्थापासून दूर राहावे अशी सूचना डॉ.भस्मे यांनी केली.
Leave a comment