शिरूर । वार्ताहर
तालुक्यात उत्तरप्रदेश वरून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या 27 लोकांचा पहिला जथ्था काल रोजी शिरूर कासार पोलीस स्टेशन येथे त्यांची आरोग्य तपासणी करून उत्तरप्रदेशच्या दिशेने 11 वाजता रवाना करण्यात आला.
तालुक्यात बाहेर राज्यातून जवळपास 250 च्या आस पास उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, राजस्थान अश्या बाहेरच्या राज्यातून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्याच्या सिझनमध्ये कुल्फी, आईस्क्रीम, पाणीपुरी, ढोसा, खमंग ढोकळा, दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी येत असतात मात्र यावर्षी ते आल्या नंतर महिनाभरातच कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातला व सर्व काही बंद पडले. लॉकडाऊन मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली मात्र महाराष्ट्र प्रशासनाने वेळीच दखल घेऊन त्यांच्यावर वेळ येण्यापूर्वीच त्यांना अन्न धान्य तात्काळ पुरवले खायची चिंता मिटली मात्र रोजगार बंद झाल्याने उत्तर प्रदेश मध्ये यांच्यावर अवलंबून असणार्या आपल्या कुटुंबासाठी त्यांना घराची ओढ लागली. मात्र चोरट्या मार्गाने जाण्यापेक्षा शासन स्तरावरून सर्व आरोग्य तपासणी करून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.आज सकाळी 8:30 वाजता शिरूर पोलीस स्टेशन मध्ये बोलावून त्यांची आरोग्य अधिकार्यांकडून आरोग्य तपासणी करून घेतली व परिवहन मंडळाच्या गाडीने औरंगाबाद येथे त्यांची रेल्वेने जाण्यासाठी सकाळी 11 वाजता रवानगी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पाणी व बिस्कीट देऊन रस्त्याने खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, मारोती केदार, आरोग्य अधिकारी डॉ. किशोर खाडे, आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी,नगरसेवक पत्रकार उपस्थित होते.
Leave a comment