नेकनुर/ मनोज गव्हाणे
पंधरा दिवसापूर्वी शांत, संयमी अशी ओळख असलेल्या सपोनी पुंडगे यांना कर्मचाऱ्यांवरील विश्वासाने दुधाचा चटका बसला यामुळे पदभार घेताच सपोनी केंद्रे यांनी स्वतः मैदानात उतरणे पसंत केले यासाठी ते सकाळी साडेसहा वाजता रस्त्यावर दाखल होत आहेत . चार दिवसापूर्वी मोटरसायकल वरील कारवाईने ते चर्चेत आले.
मोठ्या हद्दीच्या नेकनुर पोलिस ठाण्यात येण्याची अधिकाऱ्यांची स्पर्धा अलीकडे कमी झालीे आहे. संजय लोहकरे सोडले तर अनेक अधिकार्यांच्या वाट्याला कमी कालावधी अाला. सर्वात मिसळणारे सपोनी सचिन पुंडगे बदलीच्या मार्गावर असतानाच मोठ्या कारवाईला नाहक बळी पडले. त्यांना दूध पोळाले हे जानत जिल्ह्यात जुने असणाऱ्या
सपोनी एल .व्ही .केंद्रे यांच्याकडे नेकनुरची सूुत्रे आली त्यांनी ताक फुंकून कारभार सुरू केला.पदभार घेताच वयाच्या कारणास्त्व बीट आमलदारांची खांदेपालट केली. याच बरोबर स्वतः लवकर रस्त्यावर उतरत गर्दीला अटकाव केला. चार दिसांपूर्वी मोटरसायकलीवर फिरनाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला . स्वतः रस्त्यावर उतरले , कर्मचाऱ्यांना फिक्स पॉईंट दिले . कर्मचाऱ्यावर विसंबून न राहता गाडीचा ताबा घेत पेट्रोलिंग सुरू केली सहकारी अधिकारी पीएसआय काळे, रोटे, जाधव यांनी चौसाळा चेकपोस्टसह कर्तव्याच्या ठिकाणी कडक धोरण अवलंबिले आहे. कारवाईचा चटका अधिकाऱ्याला बसल्याने नेकनुर पोलिसांनी ताकही फुंकून पिणे सध्यातरी पसंत केले आहे.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment