बीड । वार्ताहर
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सगळे उद्योग धंदे बंद असताना तसेच सरकारने दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असताना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तंबाखू गुटखा आणि विशेष करून दारूचा महापूर वाहतो आहे दारू ओरिजनल आहे का डुप्लिकेट याची खात्री न करता विकणारा आणि घेणारा दोघेही ही चोरट्या पद्धतीने दारू उपलब्ध करत आहेत याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बीड जिल्ह्यात 24 मार्च पासून जिल्हाबंदी आणि संचारबंदी असताना देखील जिल्ह्यात व ग्रामिण भागातील गल्लीबोळात गुटखा तंबाखू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे जिल्ह्यातील व ग्रामिण भागातील जी शहरे आहेत त्या शहरांमध्ये हे सोप्या पद्धतीने बियर बार मालक, वाईन शॉप मालक आणि काही किराणा दुकानांमधून देखील तसेच काही खानावळी आणि हॉटेलमधून देखील दारू विक्री होत आहे. शंभर ते दोनशे रुपयाची एक क्वार्टर तब्बल पाचशे ते सहाशे रुपयांना विक्री केली जात आहे विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोही डुप्लिकेट असल्याने पिणार यांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते, मात्र आरोग्याची पर्वा न करता दारू खरेदी करत आहेत विशेष म्हणजे दारूबंदी विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे उध्वस्त केल्याची कारवाई होत आहे मात्र सोप्या पद्धतीने जी दारूविक्री होत आहे त्याला कोणाचाही लगाम नसल्याचे चित्र आहे.तरी याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.
Leave a comment