बीड । वार्ताहर

शेजारीच राहणार्‍या भावकितील मुलीला घेऊन पलायन केले. एक मुलगीही झाली. नंतर पोलिसांनी शोधून आणल्यावर प्रियकरावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. परंतू मुलगी ठाम राहिली. न्यायालयाने यावर योग्य ती कारवाई करून त्या दोघांचा विवाह लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी (दि.16) अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साध्या पद्धतीने पण आनंदात पार पडला. 

धारूर तालुक्यातील एका गावात सुरेश व सोनाली (नाव बदललेले) हे शेजारीच राहतात. भावकीच असल्याने दोघांचेही जवळचे नाते. त्यांनी 9 डिसेंबर 2017 रोजी पलायण केले. धारूर ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही नोंद झाला. सोनाली तेव्हा 17 वर्षांची होती. ते दोघेही पुण्यात राहिले. सुरेशने कंपनीत काम केले तर सोनाली घरीच राहत होती. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. 2018 साली सोनाली गर्भवती राहून तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2019 रोजी पोलिसांनी तपास करून त्यांना ठाण्यात आणले. त्यानंतर सुरेशविरोधात आगोदरच्या गुन्ह्यात अत्याचार, पोस्को आदी कलमे वाढली. हे प्रकरण माजलगाव न्यायालयात गेले.दरम्यान, न्यायालयातही सोनालीने बाजू बदलली नाही. संसार करील तर सुरेश सोबतच, असे तिने मनाशी ठाम निश्‍चीत केले होते. न्यायालयानेही सर्व बाजू समजून घेत त्या दोघांचे लग्न लावण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे शनिवारी बीड मधील सामाजिक न्याय भवनात त्यांचा विवाह साध्या पद्धतीने आनंदाच्या वातावरणात पार पडला. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.