केज । वार्ताहर
बीड जिल्ह्यातील मांगवडगाव ता.केज येथील आदिवासी समाजांपैकी पारधी समाजातील एकाच कुटुंबातील तिघांची हत्या ही माणुसकीला काळिमा फासणारी व अत्यंत चीड आणणारी आणि भयानक घटना आहे. या हत्याकांडातील आरोपींना फासावर लटकवून या कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहोत. अशी माहिती युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पूज कागदे यांनी केली आहे. केज तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, गौतम बचुटे आणि बाळासाहेब ओव्हाळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदासजी आठवले, युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे हे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देतील असे आश्वस्त करून या बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले.
बीड जिल्ह्यातील युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मांगवडगाव ता.केज येथे दि.13 मे रोजी जमिनीच्या वादातून पारधी समाजातील बाबू शंकर पवार व त्यांची मुले प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार यांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने तलवार, कुर्हाड व डोक्यात टिकवाचे घाव घालून खून करण्यात आला. तर दादूली हिला गंभीर जखमी केले व या हल्ल्यात दादूली पवार ही त्यांच्या कुटुंबातील एक जखमी महिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशावरून केज तालुका अध्यक्ष दीपक कांबळे व त्यांचे सहकारी सरचिटणीस गौतम बचुटे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ यांनी पीडित पारधी कुटुंबातील सदस्यांची केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि धीर दिला. नंतर तहसीलदार सचिन देशपांडे यांनी भेटून या हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि या हत्याकांडातील आरोपीना कठोर शासन करावे ही घटना अत्यंत क्रूर आणि दुर्मिळातील दुर्मिळ असल्यामुळे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी नामांकित वकिलांची नियुक्ती करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. मयतांच्या वारसांना सरकारी नौकरी आणि प्रत्येकी पंचवीस लाख रुची आर्थिक मदत करण्यात यावी.ता कुटुंबाचे अंबाजोगाई येथे कायमस्वरूपी स्थलांतर करून त्यांच्या मांगवडगाव येथील जमिनीच्याया बदल्यात त्यांच्या राहत्या ठिकाणा जवळ जमीन देण्यात यावी तसेच त्यांना संरक्षण देण्यात यावे आशा मागण्याचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. लवकरच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पप्पू कागदे यांनी दिली आहे.
Leave a comment