पालकमंत्री धनंजय मुंडे यांची वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

अंबाजोगाई । वार्ताहर

जिल्हा नियोजन समिती मार्फत येथील कोरोना संसर्गाच्या स्वॅब  तपासणीसाठी प्रयोगशाळा आणि रुग्णांवरील उपचारांसाठी आंतररुग्ण व्यवस्था करण्यासाठी यापूर्वी 11 कोटी निधी उपलब्ध केला असून नव्याने पंधरा कोटी रुपये दिले जातील असे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिवारी (दि.16) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली आणि त्यावेळी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने येथे सुरु असलेल्या विविध पूर्वतयारीच्या कामांची पाहणी केली. याप्रसंगी आमदार संजय दौंड माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, शिवाजीराव सिरसाट, अजय मुंडे महाविद्यालयाचे डीन डॉ.सुधीर देशमुख, वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ.राकेश जाधव, शल्यचिकित्सक डॉ.निखिल चाटे व डॉ.वेदपाठक आदी उपस्थित होते.  वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागांतर्गत व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक लायब्ररीचे काम पूर्ण केले जात असून पॅथॉलॉजिकल लेक्चर हॉलचे रूपांतर प्रयोगशाळेत करण्यात आले आहे. या लॅब साठी तीन कोटी रुपये निधी नियोजित करण्यात आला असून पॅथॉलॉजी विभागाचे रूपांतर प्रयोगशाळेत करण्यासाठी पन्नास लाख रुपये निधी ठेवण्यात आला आहे. या प्रयोगशाळेत आयसीएमआर देशपातळीवरील संस्थेची मान्यता मिळाली असून हापकिनच्या माध्यमातून विविध प्रकारची अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध केली जात आहे ही कामे लवकरच पूर्ण होऊन जिल्ह्यातील पहिली कोरोना प्रयोगशाळा कार्यान्वित होईल.कोरोना रुग्णांवर उपचारावर साठी वैद्यकीय महाविद्यालयात अंतर्गत बदल करून पाच ठिकाणी अतिगंभीर, गंभीर व इतर कोरोना रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली जात आहे.जिल्हा नियोजन समितीच्या वतीने या कामांसाठी जवळपास अकरा कोटी रुपये आत्तापर्यंत उपलब्ध करून दिले आहेत. यामधून जुना टीबी वॉर्ड, नवीन टीबी वॉर्ड, आर्थोपेडिक वॉर्ड, सात ऑपरेशन थिऐटर्स व अतिदक्षता विभाग सुसज्ज केले जात असून येथे ऍडमिट करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सर्व तयारी करण्यात आली आहे. अतिदक्षता विभाग सुसज्ज करताना येथे 50 अतिगंभीर रुग्णांच्या उपचारासह 250 रुग्णांची व्यवस्था स्वतंत्ररित्या केली जात असून यामध्ये त्यांच्या तपासण्या सेंट्रल ऑक्सीजन सिस्टम, डायलिसिस सिस्टम, पोर्टेबल एक्स-रे, पोर्टेबल सोनोग्राफी आदी तपासण्याची व्यवस्था आहे. यामुळे रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील इतर सर्वसामान्य उपचारासाठी येणार्‍या रुग्णांच्या संपर्कात न येऊ देता सर्व तपासण्या व उपचार केले जातील. यासाठी जुना निजामकालीन टीबी वॉर्ड चे रूपांतर कोरोनाव्हायरस मध्ये करण्यात आले आहे तसेच नवीन टीबी वॉर्ड मध्ये गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी आयसीयू तयार केले जात आहेत.

मराठवाड्यातील सुसज्ज रुग्णालय

दरम्यान सध्या सुरू असलेली कामे पाहता लवकरच ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे रुग्णालय व महाविद्यालय मराठवाड्यातील एक सुसज्ज म्हणून ओळखले जाईल असा विश्‍वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला कोणाच्या निमित्ताने रुग्णालयाचा कायापालट होत असल्याने भविष्यातही त्याचा फायदा या परिसरातील नागरिकांना होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, रणजित चाचा लोमटे, पंचायत समिती सभापती प्रशांत जगताप, उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे आदि उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.