बीड । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबवल्या जात आहे. बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय रुग्णालयातील नवजात शिशु कक्ष (ह काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल आणि मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट येथे सुरू करण्यात आला आहे. याहॉस्पिटल मध्ये मिळणार्या या सुविधांमुळे लहान बाळांचे आई-वडील व इतर नातेवाईक समाधान व्यक्त करत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात व बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग सुरू करण्यात आला यासाठी दवाखान्याचे प्रमुख डॉक्टर बालाजी जाधव, संचालक अजित वरपे व बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन आंधळकर यांनी यांनी पुढाकार घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात नवजात बालकांना ठेवणे धोक्याचे असल्याने यांना इतरत्र कोठे दाखल करावे हा प्रश्न रुग्णालयाच्या प्रशासनासमोर उभा राहताच आमदार संदीप क्षीरसागर यांनी या नवजात बालकांना काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी ठेवण्याची विनंती केली जेणे करून या नवजात बालकांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होणार नाही. वजन कमी असलेले, वेळेपूर्वीच जन्मलेले व जन्मतात एखादा छोटा मोठा आजार असलेले बालके येथे उपचारासाठी दाखल करण्यात येतात. कोणत्याही प्रकारची फीस न आकारता या बालकांनावर मोफत उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे मुलांबरोबरच त्यांच्या मातांना देखील येथे स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्यात आली जेणे करून या भगिनीना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. रुग्णसेवेसाठी तत्पर असलेल्या काकू नाना हॉस्पिटल वव मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिटच्या माध्यमातून ही जी बाल ऋग्नसेवा होत आहे. त्याबद्दल बालरुग्णांच्या नातेवाईकांबरोबर सर्वच क्षेत्रातून हॉस्पिटलचे कौतुक होत आहे.
Leave a comment