परळी । वार्ताहर
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात शनिवारी (दि.16) राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख व डॉ. तिडके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
या वर्षीची थिम प्रभारी समुदाय गुंतवणुक; डेंग्यू नियंत्रणाची की नुसार व सोशल डिस्टन्सींग प्रमाणे रुग्णालयातील उपस्थितांना डेंग्यू ताप परसरविणारा एडीज एजीप्टाई डास, जीवनचक्रे रोग लक्षणे, व प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत व्यक्तीत व सामाजिक योगदानाचे महत्त्व या विषयी जनजागृती पर आरोग्य शिक्षण देण्यात आले. कार्यक्रमात सर्जे, शिंदे, सादेक व रुग्णालयातील कर्मचार्यांची उपस्थिती होती. तसेच शहरातील भिमवाडी भागात आरोग्य शिक्षण देवून अॅबेटींग करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सय्यद अब्दुल खदीर, अशोक औटी यांनी परिश्रम घेतले. डॉ. दिनेश कुर्मे, डॉ. मिर्झा साजेद बेग, विजय शिंदे व मजीद यांचे तांत्रीक मार्गदर्शन लाभले.
Leave a comment