केज । वार्ताहर
तालुक्यातील होळमध्ये तीव्र पाणीटंचाई असून तातडीने पाणी टँकर सुरु करावेत अशी मागणी होळचे ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांनी निवेदनाद्वारे केजचे तहसीलदार, गटविकास अधिकार्यांकडे केली आहे. होळमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसत असल्याने चार कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परंतु गावातील त्या कुपनलिकांची पाणी पातळी कमी झाली असून प्रमुख जलस्त्रोत आटल्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील महिलांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. संबंधित महिलांना लॉकडाऊन सुरु असल्याचे सांगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याबाबत आवाहन केले आहे. मात्र त्यांनी लवकरात लवकर पाणी टँकर सुरु करावे अशी मागणी केल्याने तसे ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने आश्वासनही दिले आहे.
Leave a comment