नवीन 38 ग्रा.पं.टँकर्सची मागणी-सभापती बद्रीनाथ जगताप
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील 70 गावात तीव्र पाणीटंचाई आहे. यापैकी 38 गावात 51 टँकर्सव्दारे सध्या पाणीपुरवठा सुरु आहे. आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरोना काळातही पाणीप्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आष्टी तालुक्यातील 24 गावांचे टँकर्स मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आष्टी तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीने टकर मागणी केली आसल्याची माहिती सभापती बद्रीनाथ जगताप यांनी दिली.
मुर्शदपूर या गावाला पाच टकर्सद्वारे पाणी पुरवठा होतो. आष्टा हरिनारायण या गावाला चार टकरने पाणीपुरवठा होतोय. लोणी सय्यदमीर या गावाला तीन टकरने पाणी पुरवठा होतोय. ब्रम्हगांव, पांढरी, बीडसांगवी, पारगाव जोगेश्वरी, मातकुळी, मातावळी, वनवेवाडी, टाकळसिंग, जामगाव देवीगव्हाण, डोंगरगण, पिंपळगावदाणी या गावाला प्रत्येकी दोन टकर पाणीपुरवठा होत आहे. तर शेडाळा, रुईनालकोल, हिवरा, कर्हेवाडी, हाजीपुर, आंबेवाडी, कासेवाडी, भातोडी, बेलगाव, कर्हेवडगांव, शेरी बु. खकाळवाडी, धानोरा, चोभानिमगांव, कोयाळ, वटणवाडी, शेरी खु., सांगवीआष्टी, हरेवाडी, पिंपळगावघाट, मराठवाडी, शेकापूर या गावांना प्रत्येकी एका टकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे. उपविभागीय कार्यालय पाटोदा येथे मंजुरीसाठी पाठवलेल्या गावांची नावे पुढीलप्रमाणे:तवलवाडी, बाळेवाडी, दैठणा, पिंपळसुटी, कुंभेफळ, वाळुंज, देऊळगावघाट, सोलेवाडी, करंजी, केरूळ, देवळाली लोखंडेवाडी, चिंचोली, हनुमंतगाव, इमनगांव, वाघळुज, चिंचाळा, राघापूर, दौलावडगाव व वस्त्या, जळगांव, साबलखेड, चिखली, दादेगांव कोकरेवाडी, खरडगव्हाण, कुंभेफळ या गावाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले आहेत तर बावी, पिंपरखेड, कुंभारवाडी, धनगरवाडी, हातोला, बांदखेल, मांडवा, पोखरी, खुंटेफळपुंडी, भाळवणी, मंगरूळ, खानापूर या गावांचे नवीन प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीटंचाई कक्षात दाखल झालेले आहेत.
Leave a comment