जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
बीड | वार्ताहर
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून शनिवारी (दि.16)पाठवलेल्या सहापैकी दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्हा प्रशासन पुढील उपाय योजनेच्या कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माजलगाव गेवराई आणि बीड तालुक्यातील तब्बल 30 गावे कंटेंटमेंट आणि बफर झोन म्हणून जाहीर केले आहेत. या आदेशानुसार आता या सर्व गावात अनिश्चित काळासाठी बंद राहून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यांच्या आदेशानुसार गेवराई तालुक्यातील ईटकुरमध्ये कोरोनाचा बाधित रुग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या परिसरातील तीन व तेथून पुढील चार किलोमीटर परिसरातील गावे बफर आणि कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत.
गेवराई व बीड तालुक्यातील इटकुर या गावापासून ३ कि.मी. परिसरातील गेवराई तालुक्यातील इटकुर, हिरापुर, शिंपेगांव, कुंभारवाडी व बीड तालुक्यातील खामगांव, नांदुर हवेली व पारगांव जप्ती हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
या झोननंतर पुढील ४ कि.मी. परिसरातील गेवराई तालुक्यातील लोळदगांव, अंकोटा, शहाजानपूर चकला, मादळमोळी, कृष्णनगर, पाडळसिंगी, टाकळगांव व बीड तालुक्यातील आहेरचिंचोली. कामखेडा. पेंडगांव , हिगंणी हवेली, तांदळवाडी हवेली व पारगांव शिरस ही गांवे बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत आहेत.वरील सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे.
माजलगाव तालुक्यातील नऊ गावे बंद
माजलगांव तालुक्यातील हिवरा बु. या गावापासून ३ कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील हिवरा बु., गव्हाणथडी , काळेगांवथडी, डुब्बाथडी व भगवाननगर हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कंटेंटमेंट झोननंतर पुढील ४
कि.मी. परिसरातील माजलगांव तालुक्यातील राजेगांव, सुर्डी, महातपुरी, वाघोरा, व वाघोरातांडा ही गांवे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत ही सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येवून संचारवंदी लागू करण्यात आली आहेत.
Leave a comment