बीड | वार्ताहर

बीड जिल्ह्यातून शनिवारी नव्याने 10 जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले यापैकी 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर बीड जिल्हा रुग्णालयातील 2 रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले.

शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 6 तसेच केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 आणि परळी व माजलगावमधून प्रत्येकी 1 स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. पैकी  8 अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 2 अहवालांची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान सध्या परजिल्ह्यातून आलेले 150 जण गृह अलगीकरणात तर 40 जण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.