आष्टी । वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला कृषिक्षेत्र देखील अपवाद नाही. शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. बंदमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. कोरोनाच्या भीतीने बाजारात ग्राहक फिरकत नसल्याचे चित्र आहे. आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव येथील बबन बाबुराव झेंडे यांनी टोमॅटो चे उत्पादन घेतले आहे. कोरोना व्हायरसमुळे टोमॅटोचे पूर्ण पीक बाजरभाव नसल्याने हातातोंडाशी आलेला घास रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुष्काळ, अवकाळी अन् आता कोरोनामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकर्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बबन झेंडे या शेतकर्यांच्या डोळ्यातीळ अश्रू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकसान भरपाई देऊन पुसतील काय अशा सवाल उमठत आहे.
आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथील शेतकरी बबन बाबुराव झेंडे हे आपल्या मुलांना घेऊन उसतोड मंजूर करत असे पण या वर्षी त्यांनी शेती कडेच लक्ष देऊन आपल्या 1 एकर शेतात टोमॅटोचे उत्पादन घेतले. उसतोडणी मजुरीने भागत नसल्याने सुधारित पद्धतीने शेती करून टोमॅटोचे पिकामध्ये त्यांना साधारणतः दोन ते अडीच लाखाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा असल्याने अच्छे दिन येतील असे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी जीवतोड मेहनत घेतली.मात्र नियतीची खेळी अशी की हातातोंडाशी आलेला खास कोरोनामुळे रस्त्यावर फेकून दिल्याने या शेतकर्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.आष्टी तालुक्यात आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेले टोमॅटो आता काढणीला आला आहे. मात्र, या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. टोमॅटोचे पीक शेतातच फेकून दिले आहे. तर, लाखमोलाचा टोमॅटोचे पीक अक्षरशः जनावरांना टाकावे लागत आहे. बाजारपेठा सुरू असल्यातरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
याबाबत शेतकरी बबन झेंडे म्हणाले, दोन वेळेस मार्केटला लॉकडाऊन काळातील संकटातुन माल घेऊन गेलो मात्र,उत्पादन खर्च सोडा, साधा वाहतूक हमालीचा खर्चही निघला नाही.अच्छे दिनच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्च करून फुलवलेली टोमॅटोची बाग आज अशीच सोडावी लागत आहे.टोमॅटोचे फळासहित झाडे उपटून रस्त्यावर फेकून दिले आहेत. साधारणतः दोन ते अडीच लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती ती धुळीस मिळाल्याने माझे अश्रू थांबत नाहीत. मुख्यमंत्रीसाहेबांनी लवकर प्रशासनाला आदेश देऊन पंचनामे करावेत व नुकसान भरपाई दयावी नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही.
Leave a comment