.

 

मोरया प्रतिष्ठाण, युवा माहेश्वरी संघटनेचा पुढाकार, आता शिबिराचा दुसरा टप्पा 18 मे सोमवार रोजी!

 

बीड  । वार्ताहर

जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याकारणाने महेश नवमीचे निमित्त साधून बीड शहरातील मोरया प्रतिष्ठान व युवा माहेश्वरी बीड यांनी आदर्श उपक्रम हाती घेतला आहे. शनिवारपासून प्रत्येक सम दिनांकास रक्तदान शिबीर मोहीम राबविली जाणार आहे. हे शिबीर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या ठिकाणी घेतले जात आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ५६ लेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शिबिराचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक 18 मे रोजी पार पडेल.

सध्या कोरोना विषाणूने बीड वगळता सर्वत्र थैमान घातले आहे. असे असले तरी इतर आजारांच्या रुग्णांची संख्या जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त मिळत नाही. लॉकडाऊनमुळे सार्वजनिक शिबीरेही घेतली जात नाहीत. हाच धागा पकडून महेश नवमीचे निमित्त साधून बीड शहरातील मोरया प्रतिष्ठान व युवा माहेश्वरी संघटनेने शनिवारपासून प्रत्येक सम दिनांकास रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे शनिवारी तब्बल ५६ लोकांनी रक्तदान केले. पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या शिबीरात नाव नोंदणी करणार्यांनाच रक्तदान करण्याची परवानगी दिली जात असून जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे आवाहन संयोजक तथा नगरसेवक अमर नाईकवाडे व युवा माहेश्वरी बीड चे अध्यक्ष पंकज धुत यांनी केले आहे.

दरम्यान, या शिबीरास सर्वस्तरातून प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढी विभागातील अधिकारी, कर्मचारीही सहकार्य करीत आहेत. हे शिबीर यशस्वीतेसाठी अमर नाईकवाडे, पंकज धूत, स्वप्नील देशमुख, अमर सारडा, मयूर कासट, दत्ता गाडे, आकाश नहार, शुभम सिकची, संतोष तोेष्णीवाल, महेश लड्डा, विकी कवठेकर, संभाजी काळे यांच्यासह दोन्ही संघटनेचे सदस्य परिश्रम घेत आहेत. 

यांच्याकडे नाव नोंदणी

पंकज धुत 9970027700

स्वप्नील देशमुख 8411047373 

अमर सारडा 9423168411 

मयूर कासट 9420420315 

दत्ता गाडे 9975612323

आकाश नहार 9763555750 

शुभम सिकची 9420403984 

संतोष तोषनीवाल 9371935151 

महेश लड्डा 9075850981 

संभाजी काळे 9921175093 

विकी कवठेकर 8087111055

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.