तहसिलदार निलिमा थेऊरकर यांची कारवाई
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील देविनिमगांव तलावातील पाणी दुष्काळासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या तलावातील पाणी उपसा करणार्या शेतकर्यांचे विद्युत पंप जप्त करत त्यांना समज देण्यात आली. शुक्रवारी (दि.15) ही कारवाई तहसिलदार निलीमा थेऊरकर यांनी केली. यापुढे शेतकर्यांनी अवैध पाणि उपसा केल्यास त्यांची गय केली जाणार नाही असा ईशाराही त्यांनी दिला.
गतवर्षी तालुक्यात पाऊसाचे कमी झाल्याने सिनाच्या तलावातून या मेहकरी तलावात पाणी सोडून तालुक्यातील दुष्काळी भागांना या तलावातून टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येतो.सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असल्याने या तलावातील पाणी येणार्या काळासाठी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. शुक्रवारी तहसीलदार निलिमा थेऊरकर अंभोरा ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे,मंडळ अधिकारी आप्पा गवळी यांच्यासह या पथकात आदि अधिकारी,कर्मचारी होते.या पथकाने तालुक्यातील मेहकरी येथील तलावावरील शेतकर्यांनी पाणी उपसा करण्यासाठी टाकलेल्या अवैध मोटारी जप्त केल्या असून,संबंधित शेतकर्यांना लेखी सुचना दिल्या. यापुढे शेतकर्यांनी तलावातील पाणी शेतीसाठी उपसा करु नये. आरक्षित पाण्याचा उपसा केला तर त्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही तहसिलदार थेऊरकर यांनी दिला.
Leave a comment