गेवराई । वार्ताहर
गेवराई येथून शनिवारी (दि.16) तीन बसच्या साह्याने तालुक्यातील 72 मजुरांना प्रशासनाच्या वतीने रवाना करण्यात आले आहे. गेवराई येथून औरंगाबाद रेल्वे स्थानकापर्यंत पोहच करून तिथून पुढे हे सर्व रेल्वेने उत्तरप्रदेशकडे रवाना होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आली.
प्रशासनाच्या आदेशानंतर गेवराई तालुक्यात असलेल्या मजुरांची नोंद करून शनिवारी येथील बाजारतळ येथून तीन बसची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये एकूण 72 मजूर शनिवारी रवाना करण्यात आले. यासाठी गेवराई पोलीस ठाण्याचे नारायण खटाने,तलाठी राजेश राठोड यांनी परिश्रम घेतले तर आरोग्य विभागाच्या वतीने डॉ.राजेंद्र आंधळे,डॉ.रचना मोटे, डॉ.शेख सिराज,डॉ.संजय मिसाळ, सिस्टर रंजना वसावे यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी युवक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे,पत्रकार, सखाराम शिंदे,भागवत जाधव,जुनेद बागवान,कैलास हादगुले,सुशील टकले,मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे,गणेश पवार यांनी सहकार्य केले.
स्वगृही जाण्यासाठी उत्सुक असलेल्या मजुरांनी आज सकाळपासून ठरवून दिलेल्या बाजारतळ येथे येऊन थांबलेल्या या सर्वांना शिवस्वराज्य ग्रुपच्या वतीने प्रशांत घोटनकर,सुदर्शन गुळजकर,योगेश कापसे,राम पाटेकर,अभय पाटील,सचिन नाटकर यांनी नाष्टा व पाण्याची सोय करून निरोप दिला. तर प्रशासनाच्या वतीने या तीन बसमध्ये प्रत्येकी एक शिक्षक सोबत पाठवण्यात आले आहेत यामध्ये युनूस जमादार,पांडुरंग मोटे व संतोषकुमार दाभाडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली.
Leave a comment