माजलगाव आगारातून आठ बस धावणार ; बसमध्ये 22 प्रवासी ; उ.प्रदेशच्या मजुरांना परवानगी नाही !
माजलगाव। वार्ताहर
कोरोनाचा धोका वाढू लागल्याने राज्यभरातून लोकं आपआपल्या घरी पोहचण्यास प्रयत्नांची पराकास्टा करित असल्याने सरकारने राज्यातील परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहचविण्यासाठी परिवहन मंडळाच्या एसटी बसने सीमावर्ती भागापर्यंत मोफत सोडण्यात येत असून माजलगाव तालुक्यातून परप्रांतीय मजूर मध्यप्रदेशला सोडण्यासाठी बीड जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार माजलगाव बस आगाराच्या 8 एसटी बस सनीटरायझेशन करुन या स्वच्छ केल्या असून दि.15 शुक्रवार रोजी पात्रूडच्या परिसरातील लोणगाव रोडवर असलेल्या जिनिंगचे मध्यप्रदेशातील मजुर तपासणी करुन मेडिकल फिट -नेस सर्टिफिकेट असेल त्यांना घेवून जाण्यासाठी चार बस स्थळी दाखल झाल्या तर बस स्थानकातून एक बस 22 मजूर घेवून मुक्ताईनगर पर्यंत जाणार असल्याची माहिती आगार प्रमुख दत्तात्रय काळम पाटील यांनी बोलतांना दिली.उर्वरित बस परवानगी मिळालेल्या मजुरांना तपासणी झाल्यानंतर मार्गस्थ होणार आहे.यावेळी बसस्थानकावर महसूल,पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थीत होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता देशात पन्नास दिवसांपासून लॉकडाऊन असून हा तिसरा टप्पा 17 रोजी संपत आहे.लॉकडाऊन आणखी 31 तारखे -पर्यंत वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहे ! तर राज्यभरात अडकलेले मजूर,यात्री व विद्यार्थी यांना आपल्या घरी जाण्यासाठी पायपीट करित तर कुठं ट्रक मध्ये व अन्यथा मिळेल त्या वाहनाने आपल्या सह लहान मुलांचा जीव धोक्यात घालून कशाचीही तमा न बाळगता अनवाणी निघू लागल्याने सरकारने अशांना मोफत बसेसने सोडण्याची व्यवस्था केली असल्याने त्यांचा आपापल्या घरी जाण्याचा मार्ग हा सुकर झाला आहे.
माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पर-प्रांतीय मजूरांसाठी 5 तर शहरी भागातील मजुरांस 3 बसगाड्या मधून सोडण्यासाठी जाणार असून या सर्व प्रवाशांची मेडिकल चाचणी केल्यानंतर त्यांना परवानगी दिली जाणार असून सध्या ह्या आठ बस मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागापर्यंत व महाराष्ट्रातील मुक्ताईनगर पर्यंत येथील मजुरांना सोडण्यासाठी या बस धावणार आहेत.तर उत्तरप्रदेश,बिहार,राजस्थान येथील बरेच मजूर तालुक्यात असल्याने त्यांनी ही माजलगाव आगाराकडे संपर्क केला आहे परंतु त्या सर्वांना पहिल्यांदा नोंदणी करण्यासाठी सांगण्यात आले असून त्यानंतर मेडिकल तपासणी आणि नंतर परवानगी दिली जाईल असे त्यांना सांगण्यात आले असून अद्यापही उत्तरप्रदेश,बिहार येथील मजुरांना कुठलीही परवानगी मिळालेली नाही.
बीड जिल्हाअधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश माजलगाव आगारास प्राप्त झाले असून मध्यप्रदेश येथील मजूर एसटी बसने सीमावर्ती भाग असलेल्या मुक्ताईनगर पर्यंत सोडण्यात येणार आहे.आणखीही बस मागणीत वाढ केली तर बस गाड्या वाढवण्यास आम्ही तयार आहोत.सदरचा प्रवास महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत मोफत प्रवास असणार आहे.
दत्तात्रय काळम पाटील आगार व्यवस्थापक माजलगाव
Leave a comment