मुंबई-
मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत. मुंबईत सव्वा लाखावर खाटा उपलब्ध केल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.त्यामुळेच बॅंड्रा-कुर्ला सेंटर नंतर आता वानखेडे स्टेडिअम पालिका कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा विचार करत आहे.
जूनपर्यंत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिकेनेही तयारी सुरु केली आहे. यासाठी आज वानखेडे स्टेडिअम पालिकेच्या ताब्यात देण्याचे पत्र पालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठविले आहे.
दरम्यान, वानखेडे स्टेडिअममध्ये सरकारी कर्मचारी तसेच ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत अशा रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननेही स्टेडिअम पालिकेकडे सोपविण्याची तयारी दाखवली आहे. एमसीएला पाठविलेल्या पत्रामध्ये ही सूचना करण्यात करण्यात आली आहे.
Leave a comment