मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन
बीड । वार्ताहर
कोरोना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणा-या शिक्षकांना पन्नास लाखाचे विमा कवच देण्यात यावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष पी.एस.घाडगे, सरचिटणीस व्ही.जी.पवार यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की कोरोना व्यवस्थापन अंतर्गत अत्यावश्यक सेवा देणार्या शासकीय कर्मचार्यांना शासनाने पन्नास लाखाचे विमा कवच घोषित केले आहे. याच आघाडीवर कार्यरत शिक्षकांना मात्र हे कवच देण्यात आलेले नाही हा शिक्षकाप्रती भेदभाव असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या आपत्ती व्यवस्थापनात अत्यावश्यक सेवा देणार्या शिक्षकांना पन्नास लाखाचे विमा कवच घोषित करून भेदभाव दूर करावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment