परळी । वार्ताहर
तालुक्यातील शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस उत्पादकांना लाँकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतक-याकडे शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने खरेदी व्हावा यासाठी तालुक्यातील एक कापूस खरेदी केंद्रे सुरू आहे. त्या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी आणलेला कापूस शासनाने खरेदी करावा अशी मागणी तळेगाव येथील शेतकरी भागवत मुंडे यांनी केली आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमुळे मधल्या काळात कापूस खरेंदी बंद झाली. एकट्या परळीत हजारांवर शेतकर्यांच्या नोंदी आहेत. आता रोज एका केंद्रावर केवळ 20 शेतकर्यांच्या कापसाचे माप होत आहे. अशाने पुढील सहा महिने ही कापूस खरेदी उरकणार नाही. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक-यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वच हमीभाव खरेदी केंद्र सुरु करुन सरसकट कापूस खरेदी करावी , तसेच शेतक-यांकडे सध्या मोठ्या प्रमाणावर कापूस पिकांचे उत्पादन झाले आहे. मात्र,खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. खरेदी केंद्रावरील कर्मचारी शेतकर्यांच्या मुंडक्यावर पाय देत असून व्यापार्यांना प्राधान्य देऊन शेतकर्यांना खरेदी पासून वंचित ठेवण्याचा प्रकार करीत आहेत. हमीभाव खरेदी केंद्रही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खरीप हंगाम आवघ्या 20 दिवसावर येऊन ठेपला आहे. कापूस विक्री नाही झाला तर शेतकरी पेरणी कशी करणार.असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने खरेदी केंदावर आणलेला कापूस खरेदी करावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
Leave a comment