परळी । वार्ताहर
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याच संकटात विविध भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या विद्यार्थी पुणे येथे अडकलेले होते. त्यांच्या दोन वेळेचे मोफत जेवणाची व्यवस्था करून अनिलकुमार गित्ते यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा आधार दिला आहे. तसेच त्या विद्यार्थी आपल्या गावी जाण्यासाठी खाजगी तीन बसची व्यवस्था करून स्वारगेट ते बीड येथील विद्यार्थीना गावाकडे जाण्यासाठी रवाना केले आहेत. त्यामुळे विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करत अनिलकुमार गित्ते यांचे आभार मानले आहेत. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. परळीचे भूमिपुत्र अनिलकुमार गित्ते यांची सामाजिक संवेदनाचे समाजातून कौतुक होत आहे.
हा उपक्रम राबवित असतांना गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी परळी व बीड जिल्हा येथे जाण्यासाठी गिते यांनी तीन खाजगी बसची व्यवस्था करून दिली आहे. तसेच या आगोदर ही त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व मास्क, सेनिटरायर मोफत वाटप करून माणुसकी जागवली आहे. पुणे येथे 25 मार्च पासून सुरू केलेला हा उपक्रम आजतागायत सुरळीतपणे सुरू आहे. यासाठी सचिन ढवळे सर, गजानन ठोकळे, सहदेव घुगे हे सर्वजण परीश्रम घेत आहेत. या उपक्रमास स्वेच्छेने अनेक बांधवांनी आर्थिक मदत केली. तसेच अनेक बांधवांनी अन्नधान्य व भाजीपाला स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली.आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या 48 दिवसापासून अखंडितपणे चालू आहे. तसेच हा उपक्रम लॉकडाउन व संचारबंदी संपेपर्यंत चालूच ठेवण्याचा निर्धार अनिलकुमार गित्ते यांनी सांगितले.
Leave a comment