बीड । वार्ताहर
जिल्हा प्रशासनाने संचारबंदी शिथिलतेचा वेळ वाढवावा आम्ही सर्व नियम अन अटी पाळून सहकार्य करू असं सांगणार्या बीडच्या व्यापार्यांनी सगळे नियम गुंडाळून ठेवल्याचे चित्र शुक्रवारी (दि.15) बीड शहरात पहायला मिळाले. ना सोशल डिस्टनसिंग,ना सॅनिटायझर,ना दुकानासमोर चौकोन.व्यापार्यांनी नुसती गर्दी दुकानात घेतली.
शुक्रवारी बीडच्या बाजारपेठेत जे दृश्य दिसले ते क्लेशदायक असेच होते.दुकान मग ते कपड्याचे असो की सोन्या चांदीचे अथवा चप्पल बुटाचे किंवा जनरल स्टोअर्स प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. जे व्यापारी प्रशासनाला सहकार्य करण्याबाबत मोठमोठ्या गप्पा मारत होते त्यांच्याच दुकानात नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले.कोणत्याही दुकानासमोर चौकोन केलेलें नव्हते,ठराविक अंतरावर लोक उभे नव्हते,सर्वत्र गर्दी , झुंबड असे चित्र होते.वास्तविक पाहता दुकानात येणार्या ग्राहकाला ठराविक अंतर ठेवायला सांगणे,सॅनिटायझरचा वापर करणे हे ग्राहक अन व्यापारी दोघांच्या हिताचे आहे. मात्र या गोष्टीची खबरदारी कोणी घेत नसल्याचे चित्र दिसत आहे.
Leave a comment