सात जणांवर गेवराईत ठाण्यात गुन्हा
गेवराई । वार्ताहर
तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे अवैध वाळू साठा, तसेच वाळू वाहतूकीसाठी स्वतच्या शेतजमिनीमधून रस्ता तयार केल्याप्रकरणी सात जणांवर गुरुवारी (दि.14) गौन खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गत 30 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी खामगाव सज्जाचे तलाठी राहुल मिसाळ यांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी स्वत:च्या मालकीच्या जमिनीतून अवैध वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने वाळू चोरीचा प्रयत्न केला. रस्ते तयार करुन वाळू करुन तिची वाहतूक करण्यासाठी मदत केली. शिवाय या ठिकाणी 532 ब्रास वाळू साठा आढळून आला. त्याची किमंत 14 लाख 25 हजार इतकी असून या प्रकरणी सुभाष डाके, मारुती डाके, सुनील उदे, बाबुराव डाके, आबा डाके, रोहिदास आहेर, ज्ञानेश्वर डाके (सर्व रा.म्हाळसपिंपळगाव) यांच्यावर गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक टाकसाळ अधिक तपास करत आहेत.
Leave a comment