बीड । वार्ताहर
येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व आयुष विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात होमिओपॅथिक प्रतिबंधक औषधांचे वितरण करण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या संसर्गजन्य महामारी च्या काळात आजारच होऊ नये यासाठी काही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांच्या परवानगीने व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने होमिओपॅथीच्या प्रतिबंधात्मक औषधींचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांना व त्यांच्या घरातील नातेवाईकांना पुरवण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र गौशाल, प्रा संतोष महानोर यानी उपस्थित कर्मचार्यांना होमिओपथीक औषधोपचाराबद्दल माहिती दिली. या प्रसंगी मचिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी बीड, डॉ गणेश पांगारकर, डॉ मीना हंगे, पदव्युत्तर विभागातील डॉ नेहा, डॉ क्षमा शाह, फार्मसीस्ट शेख मुदस्सीर, सपना सिस्टर तसेच आयुष विभाग जिल्हा रुग्णालयाचे डॉ सचिन वारे उपस्थित होते. या प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषधांचा लाभ जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे 170 कर्मचारी व त्यांच्या घरातील लोकांनी घेतला. महादेव चौरे यानी सर्वांच्या वतीने आभार मानले.
Leave a comment