मुंबई  । वार्ताहर

पंतप्रधान किसान योजनेतंर्गत 9.13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हजार 253 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. पण जर जर तुमच्या खात्यात हे पैसे आले नसतील तर याची तक्रार सरकारने दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करुन करु शकता तसेच तुम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना हे कळवू शकता, असं अर्थमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी लाभार्थ्यांची नवीन यादी या महिन्याच्या अखेर किंवा पुढील महिन्यात जारी करणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2020 ची नवीन यादी सरकारचं अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जावून शोधू शकता. त्याशिवाय लाभार्थ्यांची यादी आणि ऑनलाईन अर्जदेखील दाखल करु शकता.

तुम्ही थेट कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या तक्रार निवारण हेल्पलाइनवर संपर्क साधू शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर - 155261, पीएम किसान टोल फ्री - 1800115526, पीएम किसान लँडलाइन नंबर 011- 23381092, 23382401 त्यासोबत [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क करु शकता.

जर आपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आता लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पाहायचं असेल तर सरकारने आपल्यासाठी आता ही सुविधा ऑनलाइन देखील प्रदान केली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2020 ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर तपासली जाऊ शकते.

शेतकऱ्यांना त्यासाठी pmkisan.gov.in वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दिलेल्या फार्मर कॉर्नर टॅबवर क्लिक करावे लागेल. या टॅबमध्ये शेतकर्यांना पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नावनोंदणी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीचा नोंद झाला असेल तर त्याची माहिती देखील त्यात दिसून येईल.

ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल त्यांची नावेही राज्य / जिल्हावार / तहसील / गावानुसार पाहता येतील. यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. फक्त एवढेच नाही तर आपल्या अर्जाची स्थिती काय आहे याचीही माहिती मिळू शकेल.

याबाबत आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारेही शेतकर्‍यांना माहिती मिळू शकते. याखेरीज पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात स्वत: ला अद्ययावत ठेवायचे असेल तर त्यांची लिंकही देण्यात आली आहे. या लिंकच्या माध्यमातून आपण गुगल प्ले स्टोअरवरुन पंतप्रधान किसान मोबाइल अँप डाउनलोड करू शकता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.