नेकनुर/ मनोज गव्हाणे
मोबाईल मुळे जग जवळ आलं हे खरे असले तरी यामुळे सध्या युवकांना याचा अतिवापर दिशाहीन करत असल्याचे पाहायला मिळते. सध्या प्रत्येकाकडेच अँड्रॉइड मोबाइल आणि त्यातून मिळणारा फोरजी चा वेग दोन जीबी डाटा यामुळे युवक पूर्णवेळ यामध्ये गुंतला आहे. याबरोबरच पब्जी, लुडो ,कॅरम खेळ सोबतीला कोणी असू नसो ऑनलाईन पद्धतीने खेळवले जात असल्याने तरुणांची ऊर्जा यामध्येच खर्च होताना दिसत आहे. लहान बालकांना याचा लळा मैदानी खेळा पेक्षा अधिक लागल्याने ही धोक्याची मोठी घंटा ठरू शकते . सध्याचा लॉकडाऊन पूर्णपणे तरुणाईला मोबाईलमध्ये गुंतून ठेवणारा ठरला आहे.
काळाच्या ओघात अनेक गोष्टी सोपस्कार आणि फायद्याच्या निर्माण झाल्या असल्या तरी यामध्ये नुकसानही तेवढेच दडल्याचे सध्या सुरू असलेल्या मोबाईलचा वापराने दिसून येते. जगातील कुठलीही गोष्ट लवकर आणि सहजतेने सर्वांच्या हातात आली. जग जवळ आले असले तरी अँड्रॉइड मोबाईलच्या अतिवापराने तरुणांची ऊर्जा नको तिथेच जास्त प्रमाणात खर्च होताना पाहायला मिळते . 4gयातून मिळणारा डाटा तरुणांना दिशाहीन करण्याचे काम करणारा ठरतो आहे. फेसबुक, व्हाट्सअप संवादाचे साधन बनले. गुगलने जगाला जवळ आणले याचा उपयोग चांगल्या कामासाठी करणारे युवक कमी असल्याचे आढळून येते. यापेक्षा त्याचा वापर इतर गोष्टीसाठी अधिक प्रमाणात होत असल्याने तरुणांना या साधनाने जेरबंद करीत यामध्ये गुरफटून ठेवले. पब्जी ,लुडो ,कॅरम हे खेळ तरुणांना वेळचे महत्त्वही कळू देत नाहीत. अनेक ठिकाणी या खेळांचे डाव सुरू झाले तर कधी संपतील याचा नेम नसतो. खेळायला कोणी सोबत नसेल तर ऑनलाईन पद्धतीने ते खेळवले जात असल्याने पूर्णवेळ युवक याच्या आहरी गेल्याचे धक्कादायक वास्तव अनेक प्रश्न निर्माण करणारे आहे. तरुणा सोबतच लहान बालके ही या खेळात डुबल्याने बालपण मैदानापेक्षा स्क्रीनवरच अडकल्याने बालकांत गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मानेचा त्रास ,डोकेदुखी ,डोळे यांना गंभीर परिणाम होत असल्याचे आढळून येत असले तरी अजूनही अाहरी गेलेल्या तरुणांना ना भविष्याचा वेध आहे ना आरोग्याची चिंता .
" तरुणासोबतच बालकात होत असलेला मोबाईलचा अतिवापर नुकसान कारक आहे शिवाय यामुळे आरोग्याची हानी होत आहे.
असे असताना यामध्ये अडकलेला तरुण मान दुखी, डोळे, डोकेदुखी आशा आजारांना निमंत्रण देत आहे.
मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करून शक्यतो लहान मुलाच्या हाती देऊच नये."
_डॉ. सचिन आंधळकर बाल रोग तज्ञ,
अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नेकनुर.
Leave a comment