आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरुन राजकारण तापलं आहे

खरं तर, संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली आहे. पण त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. आता अखेर देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं मोठी कारवाई केली आहे. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध नावं समोर येत असल्याने ही संघटीत गुन्हेगारी असल्याचं पोलिसांकडून कोर्टात सांगितलं जात होतं. टोळीच्या माध्यमातून बीडमध्ये गुन्हे केले जातायत, असं कोर्टात सांगितलं जात होतं. आता मोक्का कलम लावण्यात आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीनं सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली असली तरी ही कारवाई वाल्मिक कराडवर होणार नाही. कारण अद्याप वाल्मिक कराड याचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नाही. पोलिसांनी वाल्मिकला दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक केली आहे. देशमुख हत्या प्रकरणात त्याचं कनेक्शन बाहेर आल्यास वाल्मिकवर देखील ही कारवाई होऊ शकते. पण तूर्तास एसआयटीने वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

6 डिसेंबर
- संतोष देशमुखांचा मस्साजोग पवनचक्कीवर वाद
9 डिसेंबर
- सरपंच संतोष देशमुखांची हत्या
- धनंजय देशमुखांनी केली केजमध्ये तक्रार
- केज पोलिसात 6 जणांविरोधात गुन्हा

10 डिसेंबर
-बीडमध्ये सामान्यांचा रास्तारोको
-जयराम चाटे आणि महेश केदारला अटक

11 डिसेंबर
- क्राईम ब्रांचकडून प्रतिक घुलेला अटक
- वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा

13 डिसेंबर
- बीड जिल्हा बंदची हाक
- देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे

14 डिसेंबर
- केज पोलीस निरीक्षक महाजन सक्तीच्या रजेवर
- विष्णू चाटेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

18 डिसेंबर
- विष्णू चाटेला अटक
19 डिसेंबर
- देशमुखांच्या शवविच्छेदनात मारहाण झाल्याचं स्पष्ट
21 डिसेंबर
- पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली
- नवनीत कॉवत नवे पोलीस अधीक्षक
- शरद पवार,अजित दादांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट

24 डिसेंबर
- खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
28 डिसेंबर
- जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा
31 डिसेंबर
- वाल्मिक कराड सीआयडीला शरण
3 जानेवारी
- डॉ. संभाजी वायबसे, सिद्धार्थ सोनावणेला घेतलं ताब्यात
4 जानेवारी
- सुधीर सांगळे, सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक
6 जानेवारी
- शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
- धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्वपक्षीयांची राज्यपालांची भेट

7 जानेवारी
-देशमुख कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
-आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.