पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी लक्ष देण्याची मागणी
टाकरवण । वार्ताहर
गत दीड महीन्या पासुन सपुर्ण देश लॉकडॉऊन करण्यात आला यामुळे सर्वच व्यवाहार हाताला मिळणारे रोजची कामे बंद झाली आहेत. दिव्यांग व्यक्तीना जगावे कसे असा प्रश्ऩ त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. यात दिव्यांग व्यक्तीसाठी 1257 कोटी 50 लाखाचा सामाजिक न्याय व विशेष साय्यक विभागामार्फत निधी मंजुर केला आहे.पालकमंत्री धनंजय मुंडे या नात्याने प्रत्येक ग्रामपंचायत कडुन दिव्यांग व्यक्तीना मिळणारा पाच टक्के निधी तसाच पडुन असून पालकमंत्री मुंडे यांनी लक्ष दिले तर लगेच मिळु शकतो असा विश्वास दिव्यांग व्यक्तीकडुन व्यक्त केला जात आहे.
चौदाव्य वित्त आयोगाच्या निधीतुन पाच टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तीना देण्याचे आदेश प्रत्येक ग्रामपंचायतला आसताना देखिल माजलगांव तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतने ग्रामपंचायत आतर्गत असणार्या दिव्यांग व्यक्तींना दिला गेला नाही.याकडे पंचायत समिती गटविकास आधिकारी यांचे दुर्लक्ष आसल्याने निधी वाटपास ग्रामपंचायत सह ग्रामविकास आधिकार्याकडुन रेड सिग्नल दाखवले जात आहे.कोरोनाच्या काळात या व्यक्तीना निधी मिळाला तर त्याना लागणारे औषधासह घरखर्च धकु शकतो मात्र या निधी वाटपा विषय मुळात गविकास आधिकारी यांना कसल्याच प्रकारचे गांभिर्य नसल्याने रेड सिग्नल दाखवण्याचे धाडस हे ग्रामविकास आधिकारी व ग्रामपंचायत दाखवत आहे.पंरतु पालकमंत्री मुंडे यांनी लक्ष दिले तर लगेच ग्रामपंचाय दिव्यांगाला त्यांचा हक्काचा निधी वाटप करण्यास सुरूवात करिल असा विश्वास त्यांना आहे. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतच्या खात्यावर हा निधी उपलब्ध आसता देखिल हा निधी वाटप करण्यास का.? चाल ढकल केली जाते या प्रश्नाचे उत्तर आद्यापही दिव्यांग व्यक्तीना मिळु शकले नाही. दरम्यान माजलगांव पंचायत समिती सभापती श्रीमती सोनाली खुळे यांच्या गांवातील दिव्यांग व्यक्तीना कोरोनाच्या काळात चोदाव्य वित्त आयोगाच्या निधीतुन पाच टक्के मिळणार्या निधीचे प्रतिक्षेत आहेत.पंरतु मिळुन देण्यात त्या देखील आपयशी ठरत आहेत.
--------
Leave a comment