प्रा.सचिन उबाळे यांचा अभिनव उपक्रम
बीड । वार्ताहर
स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी होते. मात्र कोरोना सारखे आज देशावर संकट असतांना प्रा.सचिन भैय्या उबाळे यांनी एक अभिनव उपक्रम राबवला.
आमदार नितेश राणे, पंकजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख किशोर उबाळे, भाजपचे भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, डॉ.लक्ष्मण जाधव, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव,अजय सवाई, यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबीरास सुरुवात केली. या आरोग्य तपासणी शिबीराचा 732 गरीबांनी लाभ घेतला. प्रा.सचिन उबाळे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या शिबीरामध्ये स्नेहनगर, मोतीमहल, सटवाई मैदान, सुभाष रोड, सहयोग नगर,आनंद विहार परिसरातील नागरिकांची मोफत अरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबीराचा 732 नागरिकांची लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अमर विद्यागर, नगरसेवक शुभम धुत, सनि वाघमारे, राहुल सवई, पिंटू निर्मळ, विलास बामणे, दत्ता परळकर, संग्राम बांगर,अमोल वडतिले, अॅड.संगिता धसे, संध्या राजपुत, यांची उपस्थिती होती. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोला जाधव, बाळासाहेब कदम,अभिजित उबाळे, नितीन डिसले, गणेश माने, विकास वायभट, सागर टेकाडे, मयुर त्रिभुवन, विशाल गायकवाड, अमर जगताप, शुभम प्रधान,विशाल भोरे,यांनी मेहनत घेतली.
Leave a comment